
राज्यभरात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. दोन दिवसापासून मुंबई, ठाणे आणि कोकणात पावसाच्या सरी बरसत आहेत. कोकण किनारपट्टीसह पुणे, सांगली, सातारा व मराठवाड्यातीलही बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. विदर्भातही जोरदार पाऊस बरसत आहे. आता अरबी समुद्रावर पावसासाठी वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाल्याने पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ व मराठवाड्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. तळ कोकणासह मुंबई व उपनगरात, ठाणे आणि पालघरमध्येही पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेत हवामान विभागाने काही ठिकाणी अलर्ट जारी केले आहेत.
बंगालच्या उपसागरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे उपसागराच्या भागात कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. अरबी समुद्रावरही जोरदार वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय झाले आहेत. त्यामुळे कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र व महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील पाच दिवस कोकण किनारपट्टीसह विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पाऊस विश्रांती घेणार आहे. घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
22 Jul:पुढील ४-५ दिवस महाराष्ट्रात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता.#कोकण,#घाट आणि #विदर्भाच्या काही भागात याचा जास्त प्रभाव व काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता.#मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
IMD@RMC_Mumbai @imdnagpur
दैनिक अपडेट्सवर पहावीत pic.twitter.com/aKeLAlHlFp— K S Hosalikar (@Hosalikar_KS) July 22, 2025
भारतीय हवामान विभागाने 22 जुलै रोजी हवामानाचा अलर्ट जारी केला आहे. यानुसार मुंबई व उपनगरासह ठाणे ,पालघर तसेच संपूर्ण कोकणपट्टीला पाऊस झोडपणार आहे. मध्य महाराष्ट्रात सातारा कोल्हापूर घाटमाथ्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आज हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असून मराठवाड्यात धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यांना पावसाचे यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.