
घर खरेदी करणाऱयांची फसवणूक आणि ठरल्या वेळेत घरांचा ताबा न देणाऱया बिल्डरांकडून नुकसानभरपाई वसूल करण्याचे आदेश महारेराने दिले होते. पण बिल्डरांकडील वसुलीचे प्रमाण कमी आहे. महारेराच्या आदेशानंतरही बिल्डरांकडून 430 कोटी रुपयांची नुकसानभरपाई वसूल झाली नसल्याची कबुली मंत्री शंभुराज देसाई यांनी आज विधानसभेत दिली.
राज्यात महारेराने घर खरेदी करणाऱयांच्या नुकसानभरपाईपोटी जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याच्या संदर्भात भाजपचे सदस्य अतुल भातखळकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. घर खरेदी करणाऱयांची फसवणूक करणाऱया आणि वेळेत घरांचा ताबा न देण्याच्याबाबत 1 हजार 291 तक्रारी आल्या होत्या. या ग्राहकांना नुकसानभरपाईपोटी बिल्डरांकडून 792 कोटी रुपये बसूल करण्याचे आदेश महारेराने डिसेंबर 2025मध्ये जारी केले होते. पण तब्बल 200 कोटी रुपये अद्यापपर्यंत विकासकांकडून वसूल झाले नाही याकडे सभागृहाचे प्रश्नाद्वारे अतुल भातखळकर यांनी लक्ष वेधले.



























































