
पुणे रेल्वे स्थानकाबाहेरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची माथेफिरुने घोर विटंबना केली. त्याने पुतळ्याची कोयत्याने तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी माथेफिरू सूरज आनंद शुक्ला याला अटक केली. तो मूळचा वाराणसीतील आहे. दरम्यान, काँग्रेसने पुतळय़ाला दुग्धाभिषेक केला.