खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतिपदाच्या झालेल्या निवडणुकीत संचालक तथा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्यासह आठ संचालक अनुपस्थित राहिल्याने निवडणूक विनविरोध झाली. सभापतिपदासाठी विजयसिंह शिदि, उपसभापतिपदासाठी क्रांती सोमवंशी यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे अध्यादशी अधिकारी तथा सहकार सहायक निबंधक सचिन सरसमकर यांनी जाहीर केले. विधानसभा निवडणूक तोंडावर असलेली असताना अशी पीछेहाट होणे हे दिल्लीप मोहिते-पाटील यांच्यासाठी घोक्याची घंटा मानली जात असून, या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.
सभापती विजयसिंह शिंदे यांच्या अर्जावर सोमनाथ मुंगसे सूचक, तर सागर मुझे हे अनुमोदक होते. उपसभापती क्रांती सोमवंशी यांच्या अर्जावर अनुराग जैद सूचक, तर सुधीर भोमाळे हे अनुमोदक होते. सभागृहात संचालक अशोक राक्षे, सयाजी मोहिते, महेंद्र नीरे, माणिक गोरे, सोमनाथ मुंगसे उपस्थित होते.
आमदार मोहिते यांच्यासह 7 संचालक या निवडणुकीसाठी उपस्थित राहण्याचा अंदाज बांधत पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जागोजागी चेकपोष्ट उभारली होती. आमदार मोहिते समर्थक संचालकांपैकी कैलास लिंभोरे, विनोद टोपे, रणजित गाडे, जयसिंग भोगाहे हे निवडणूक सभागृहात दाखल झाले. मात्र, त्यांनी निजडणूक प्रक्रियेत सहभागी न होता निवडणूक प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आम्ही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे लेखी म्हणणे सादर करून त्यांनी काढता पाय घेतला.
संचालक मंडळाच्या निवडीला पणनमंत्र्यांकडून 27 सप्टेंबरला स्थगिती मिळवण्यात मोहिते यशस्वी ठरले, मात्र, 10 संचालकांनी उच्च न्यायालयात जाऊन या निवडणुकीवरची स्थगिती उठवण्यासाठी दाद मागितली. उच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवत 10 सप्टेंबरला निवडणूक घेण्याचे निर्देश देत निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्या ताब्यात असणाऱ्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती निवडणुकीत तालुक्यातील सर्वपक्षीय विरोधी गटातील संचालकांनी एकत्र येऊन ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार मोहिते यांच्या एकहाती सत्तेला सुरुंग लावला. या निवडणुकीत विजयसिंह शिंदे यांची सभापतिपदी आणि क्रांती संदीप सोमवंशी यांची उपसभापतिपदावर बिनविरोध निवड झाली. विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आमदार दिलीप मोहिते- पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, तालुका अध्यक्ष हिरामण सातकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अनिल बावा राधे, अतुल देशमुख, सुधीर मुंगसे, शिंदे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर, नितीन गोरे, अमर शिंदे, उद्धव ठाकरे शिवसेनेचे अशोक खांडेभराड, रामदास धनवटे, शिवाजी वर्षे, संजय घनवट, बाबाजी काळे, तनुजा घनवट आदी उपस्थित होते.