राज्यात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शनिवारी मुंबईसह महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आले. तोंडाला काळी पट्टी लावून आणि हातात काळे झेंडे घेऊन आपल्या लेकीबाळीच्या रक्षणासाठी हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. महिलांची संख्या लक्षणीय होती. ‘आंधळे बहिरे महायुती सरकार…महिलांवर होतायत अत्याचार’, ‘लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे’ अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली.
चिमुकलीवरील अत्याचाराच्या विरोधात मराठवाडा रस्त्यावर
बदलापूरमध्ये चिमुकलींवर झालेल्या अत्याचारासह राज्यात महिलांवर दररोज होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात शुक्रवारी अवघा मराठवाडा रस्त्यावर उतरला. पाऊस पडत असतानाही उत्स्फूर्तपणे जनतेने सरकारच्या निर्लज्जपणाचा तीव्र निषेध केला. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीडसह लातूर, धाराशिव जिल्ह्यातही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हातात काळे झेंडे आणि तोंडाला काळी पट्टी बांधून चिमुकलीवरील अत्याचाराचा निषेध केला.
View this post on Instagram