मिंधे सरकारची शेवटची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने 80 निर्णय घेतले. पण गेल्या दोन वर्षात मिंधे सरकारने फक्त महाराष्ट्र लुटला असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
एक्सवर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे निर्णय गेल्या दोन वर्षात का नाही घेतले हा प्रश्न आहे. हे निर्णय म्हणजे अच्छे दिन सारखे मिंधे गटाची पोकळ आश्वासनं आहेत. गेल्या दोन वर्षांत शिंदे आणि लुटारु गँगने महाराष्ट्राला फक्त लुटले आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
The question is, why did the illegal cm Shinde not take these decisions in the past 2 years.
These are hollow promises of the minde bjp, that people know, just like Achche Din.For 2 years, Shinde and loot gang only looted Maharashtra. https://t.co/47dEnIYRlV
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 10, 2024