कुठेही लप, तुला शोधून काढेन! अश्लील भाषा वापरणाऱ्याला महेश मांजरेकरांचा इशारा

11385

मराठी आणि हिंदी चित्रपटात जबरदस्त कामगिरी करणारे महेश मांजरेकर हे त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर अश्लील शेरेबाजी करणाऱ्या एका व्यक्तीवर भयंकर संतापलेले आहेत. महेश मांजरेकरांनी नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. गुढी पाडव्याच्या दिवशी त्यांनी संपूर्ण कुटुंबासोबत काढलेला हा फोटो होता. या फोटोवर एकाने अश्लील शेरेबाजी केली होती. या प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीला महेश मांजरेकरांनी इशारा दिला आहे.

manjrekar-family

महेश मांजरेकरांनी शेअर केलेल्या या फोटोवर अनेक लाईक्स आले आहेत तसेच प्रतिक्रियाही आल्या आहेत. प्रसिद्ध मंडळींना ट्रोल करण्याचं एक नवं चलन रूढ होत चाललं आहे. मात्र महेश मांजरेकरांच्या या फोटोवर प्रतिक्रिया देणाऱ्याने सभ्यपणाची पातळी सोडून प्रतिक्रिया दिली. महेश मांजरेकरांनी फोटो अपलोड करताना लिहिलं होतं की “आज गुढी पाडवा, पण कोरोना वर विजय मिळवून मग धूम धडाक्यात साजरा करू. तोवर घरीच राहा, सुरक्षित राहा, कुटुंबासोबत छान वेळ घालवा”

या फोटोवर एकाने जी प्रतिक्रिया दिली ती वाचून महेश मांजरेकरांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांच्या जागी कोणीही असता तर तो देखील ही प्रतिक्रिया वाचून संतापला असता. ही प्रतिक्रिया वाचून महेश मांजरेकरांनी त्याला उत्तर दिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं की ‘तू ज्या दिवशी माझ्या तावडीत सापडशील तो दिवस तुझ्यासाठी भयानक असेल,मी तुला शोधून काढेन! सध्याचे हे दिवस जाऊ देत त्यानंतर तू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात लपून बसला असशील तरी तुला मी शोधून काढेन’

आपली प्रतिक्रिया द्या