व्यावसायिकाच्या घरी चोरी प्रकरणी मोलकरीण ताब्यात

व्यावसायिकाच्या घरी 19 लाखांचे दागिने चोरीप्रकरणी मोलकरणीला कांदिवली पोलिसांनी अटक केली. तक्रारदार हे कांदिवलीत राहतात. त्यांच्याकडे दोन महिला मोलकरीण कामाला आहेत. अटक केलेल्या महिलेकडे जेवण बनवण्याची जबाबदारी होती. दिवाळीनिमित्त तक्रारदार हे माथेरानला फिरण्यासाठी गेले होते. माथेरानहून परत आल्यावर घरी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यामुळे त्यांनी कपाटातील दागिने काढण्यासाठी गेले असता दागिने गायब झाल्याचे समजले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून मोलकरणीला ताब्यात घेतले.