ब्लू प्रिंटबाबतच्या प्रश्नावर मैथिली म्हणाली, ही तर … नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

बिहारच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि सगळ्या पक्षांची लगबग सुरू झाली. कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता उमेदवार निश्चित झाले असून प्रचारालाही सुरूवात झाली आहे. सध्या बिहारच्या राजकारणात एका नव्या चेहऱ्याची चर्चा होतेय, ते नाव म्हणजे प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर. आपल्या मधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्घ करणारी मैथिली आता राजकरणात आपल नशीब आजमवताना दिसत आहे. तिला भाजने उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपच्या उमेदवार असलेल्या मैथिलीला राजकरणात आल्यापासून ट्रोलिंगला सामोरे जावे लागतेय. तिने केलेल्या काही विधांनामुळे तिची खिल्ली उडवली जात आहे.

सध्या मैथिलीचा एका इंटरव्यूमधील व्हिडीओ प्रंचंड व्हायरल होतोय. मैथिली सध्या बिहारमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी मैदानात उतरली आहे. यावेळी तिला अनेकदा पत्रकारांच्या प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नांची उत्तरे देताना तिची तारांबळ उडताना दिसतेय. एका पत्रकाराने मैथिलीला तुमची विकासाची ब्लूप्रिंट काय आहे? असा प्रश्न विचारला. यावर मैथिलीने दिलेल्या उत्तराने सगळ्यांनाच सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. यावेळी मैथिलीने क्षणाचा विलंब न लावता लगेचच उत्तर दिलं आणि म्हणाली, “मी हे सर्वांसोबत कसं शेअर करू? ही पूर्णपणे वैयक्तिक आणि गोपनीय बाब आहे…”. तिच्या या उत्तरावर नेटकऱ्यांनी तिची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

मैथिलीचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमुळे तिला ‘ब्लूप्रिंटची सीक्रेट एजंट’असं म्हटलं जातय. खरतर राजकरणी म्हटल तर त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रातील सखोल ज्ञान असणे आणि प्रत्येक परिस्थितीची समज असणे गरजेचे असते. मात्र मैथिलीच्या अशा उत्तरांमुळे आता तिच्या राजकीय ज्ञानावर प्रश्न उपस्थित केले जातायत. ‘ खरं तर मैथिलीने राजकारणात यायलाच नको होते. यामुळे तिचे गायन क्षेत्र धोक्यात आहे… असं एका युजरने म्हटले आहे. तर राजकरणात अशा लोकांची गरज नाही ज्यांना राजकरणातला र…. पण माहित नसेल… ,असे खडेबोल नेटकऱ्यांनी सुनावले आहेत. तर एका युजरने तेलही गेले, तुपही गेले…अशी तिची अवस्था होऊ नये, असे म्हटले आहे.