माजिवडा ते कापूरबावडी सर्कल ट्रॅफिकचा 21 दिवस जांगडगुत्ता; उड्डाणपुलावर मास्टिक टाकण्याच्या कामामुळे वाहतुकीचे तीनतेरा

पावसाळ्यात खड्यांमुळे अनेक पुलांची दैना उडून कंबरतोड प्रवास करावा लागतो. त्यातून मार्ग काढण्यासाठी ठाण्यातील माजिवडा उड्डाणपुलावर आजपासून 21 दिवस मास्टिक टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी रात्री 11 ते पहाटे 5 वाजेदरम्यान वाहनचालकांना अन्य मार्गावरून ये-जा करावी लागणार आहे. मात्र या कामामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजणार असून माजिवडा ते कापूरबावडी सर्कल दरम्यान रोजच ट्रॅफिकचा जांगडगुत्ता होणार आहे.

मागील काही दिवसांपासून घोडबंदर भागातील गायमुख घाटाचे काम हाती घेण्यात आले होते. यामुळे दोन दिवसाला भागात त्यात आता पावसाळ्यापूर्वी माजिवडा येथील उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. पावसाळ्यात पुलावर खड्डे पडून वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून हे काम हाती घेतले आहे. मास्टिक काढल्यानंतर रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत या मार्गावरुन जाणारी वाहतूक ही पूर्णपणे बंद ठेवावी लागणार आहे.

कामामुळे कापूरबावडी सर्कल आणि माजिवडा उड्डाणपुलाखाली वाहतूककोंडी वाढणार आहे. सध्या मेट्रोचे काम सुरू असल्याने वाहतुकीचा वेग आधीच मंदावला असताना आता त्यात उड्डाणपुलावरील वाहतूकदेखील खालून जाणार असल्याने कोंडीत अधिकच भर पडणार असल्याचे चित्र दिसत आहे.

अशी असेल नो एण्ट्री
मुंबई अथवा नाशिकला जाणाऱ्या वाहनांना तत्त्वज्ञान ब्रीज चढणी येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून सर्व प्रकारची वाहने ही स्लीप रोडने कापूरबावडी सर्कलमार्गे इच्छितस्थळी जातील, भिवंडीन नाशिक वाहिनी बाळकुम फायर ब्रिगेड ब्रीज चढणी येथून पुलावरून मुंबई अथवा नाशिकला जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना ब्रीज चढणी येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. येथून जाणाऱ्या सर्व प्रकारची वाहने ही स्लीप रोडने कापूरबावडी सर्कलमार्गे इच्छितस्थळी जाऊ शकणार आहेत.