
रांची येथील विमानतळावर आज मोठा विमान अपघात टळला. पाटण्याहून 175 प्रवाशांना घेऊन येणाऱया इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला लँडिंग होण्यापूर्वी गिधाडाने धडक दिली. यामुळे विमान 40 मिनिटे हवेतच घिरटय़ा घालत होते. अखेर पायलटने अत्यंत काैशल्याने इमर्जन्सी लँडिंग केले.
इंडिगोच्या विमानाने (एअरबस 320) पाटणा विमानतळावरून रांचीकडे उड्डाण केले. विमान रांची येथील बिरसा मुंडा विमानतळावर लँडिंग करणार होते. मात्र विमान 10 ते 12 नॉटिकल मैल अंतरावर अर्थात 4000 फूट उंचीवर असताना एका पक्ष्याने धडक दिली. हा पक्षी गिधाड होता. धडकेमुळे विमान काही काळ भरकटले. 175 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र पायलटने समजदारी दाखवत अत्यंत काwशल्याने 40 मिनिटांपर्यंत विमान हवेत ठेवले. त्यानंतर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सर्व प्रवाशी सुखरूप असून विमानाचे मात्र नुकसान झाले आहे. या अपघात प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.