
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला निर्वाणीचा इशारा दिला आहे. इराणसाठी हीच वेळ आहे की त्यांनी खूप उशीर होण्यापूर्वी करार करावा. इराण अजूनही एक महान राष्ट्र बनू शकते. पण काहीही शिल्लक न राहण्याआधी आता करार करण्याची वेळ आली आहे, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. यासोबत त्यांनी एक व्हिडीओही शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अमेरिकन सैन्याने इराणमधील सर्वात मोठा पूल पाडल्याचे दिसत आहे.
US President Donald Trump posts on Truth Social, “…It is time for Iran to make a deal before it is too late and there is nothing left of what still could become a great country…” pic.twitter.com/CrmxmVluPU
— ANI (@ANI) April 2, 2026
गुरुवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. अमेरिकन सैन्याने केलेल्या हल्ल्यात इराणमधील सर्वात मोठा पूल पाडण्यात आला आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले. इराणची राजधानी तेहरानला पश्चिमेकडील कारज शहराशी जोडणाऱ्या महामार्गावरील पुलावर गुरुवारी हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
अमेरिका-चीन संघर्ष समुद्रापर्यंत पोहचला; जहाजांना रोखण्यावरून दोन्ही देश आमने-सामने



























































