
सामना प्रतिनिधी । परभणी
अखंड हिंदुस्थानचे अराध्य दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या आयोध्येतील भव्य राम मंदिरासाठी संसदेत कायदा करण्यात यावा, अशी मागणी आज आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद तथा राष्ट्रीय बजरंग दलातर्पेâ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हाधिकारी पी. शिवाशंकर यांना आज आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद तथा राष्ट्रीय बजरंग दलाचे देवगिरीप्रांत अध्यक्ष प्रकाश लाखरा यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून लिहिलेल्या निवेदनात ही मागणी करण्यात आली. यावेळी प्रदीप पवार, विनोद शर्मा, चैतन्य केंद्रेकर, जय लखेरा, अजय पारीख, रोहित पारवेकर, पवन डाखोरे, रमाकांत लखेरा, कैलास पारिख, रितेश अग्रवाल, अमर लड्डा, अमित अग्रवाल, विपीन कुचेरिया, व्यंकटेश शर्मा, निलेश तिवारी, आनंद शहाणे, नितीन अग्रवाल, अनिल गायकवाड, योगेश लासे, महेश सोनी, श्रीनिवास शहाणे, प्रदीप धर्मशेट्टी, आनंद जोशी, नितीन जाधव-गोगलगावकर, ज्ञानेश्वर पवार, बाळराजे तळेकर, संदीप पांगरकर, राहुल खटींग आदींची उपस्थिती होती. विशेष म्हणजे शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांची सुद्धा यावेळी समर्थनार्थ उपस्थिती होती. सर्वोच्च न्यायालयाकडून राम मंदिर उभारणीसाठी आदेश होतील. या आशेवर हिंदू समाज होता. परंतु न्यायालयीन निर्णयाची अनिश्चीत काळापर्यंत हिंदू समाज वाट पाहू शकणार नाही. प्रभू रामचंद्राच्या जन्मस्थानावर भव्य मंदिर असावे, अशी कराडो हिंदुंची भावना आहे. त्यामुळे संसदेत कायदा करुन भव्य राममंदिर उभारण्यास सुरुवात करावी, असेही या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे.


























































