कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणासारख्या संवेदनशील विषयावर 22 ऑगस्टला पत्र लिहून बलात्कार करणायाला कठोर शिक्षा देण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली होती, परंतु, मला इतक्या संवेदनशील विषयावर तुमच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सरकारकडून प्रत्युत्तर आले असले तरी, या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेतले नाही, अशा शब्दांत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी खंत व्यक्त केली असून केंद्र सरकारने बलात्कार आणि हत्येसारख्या गंभीर गुह्यांबाबत कडक कायदा करावा आणि विहित मुदतीत खटला संपवण्याची तरतूद या कायद्यात असावी अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी मोदींकडे पत्राद्वारे केली आहे. कोलकाता बलात्कार आणि हत्येप्रकरणी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना आठ दिवसांत दुसरे पत्र लिहीले आहे.
केंद्र सरकारने पहिल्या पत्राला काय उत्तर दिले
केंद्र सरकारच्या वतीने महिला विकास आणि पुटुंब कल्याणमंत्री अन्नपूर्णा देवी यांनी ममता बॅनर्जी यांच्या पहिल्या पत्राला उत्तर दिले. बंगालमध्ये एपूण 123 फास्ट ट्रक कोर्ट सुरु करण्यात आले होते, परंतु, त्यापैकी बहुतांश बंद आहेत. याशिवाय बंगालमधील पोक्सोच्या प्रलंबित प्रकरणाबाबत ममता सरकार कोणतीही पावले उचलत नसल्याचे अन्नपूर्णा देवी म्हणाल्या होत्या.