
पश्चिम बंगालच्या म्ख्युमंत्री ममता बॅनर्जी यांनी विशेष संदेशाद्वारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली. ‘बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्व बहुपेडी होते. एक विचारवंत, कलाकार व नेते म्हणून त्यांनी सामाजिक व राजकीय जीवनावर अमीट ठसा उमटवला. अमोघ वाणी, व्यंगचित्र कला आणि कुशल नेतृत्वाने बाळासाहेबांनी लोकांचे असंख्य प्रश्न चव्हाटय़ावर आणले. महत्त्वाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत लोकमत घडवले,’ अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी बाळासाहेबांचा गौरव केला.





























































