
यवतमाळमध्ये एका महिलेचे एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. या महिलेचे आणि या व्यक्तीचे पैश्यांवरून वाद होत होते. यातूनच या महिलेचा खून झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळच्या सोनुर्ली शिवारातील जंगलामध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेच्या अंगावर जखमा होत्या. पोलिसांनी या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. महिलेचा खून झाल्याचे शवविच्छेदनातून निष्पण्ण झाले. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला तेव्हा त्यांना आरोपी सापडला.
मृत महिलेचे नाव आरती असल्याचे समोर आले. आरती आणि गणेश एका खासगी जिनींगमध्ये काम करत होते. आरतीचे लग्न झाले होते. तरी आरतीचे आणि गणेशचे विवाहबाह्य संबंध होते. आरती सतत गणेशकडे पैसे मागायची. त्यामुळे दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे. आरती पैशाच्या तगादा लावत असल्याने गणेश कंटाळला होता. शनिवारी आरतीने गणेशला भेटायला बोलावलं आणि त्याच्याकडे पाच हजार रुपये मागितले. पैसै दिले नाही तर पोलिसांकडे खोटी तक्रार करण्याची तिने धमकी दिली. तेव्हा रागाच्या भरात गणेशने आरतीवर चाकूने वार केले. त्यात आरतीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गणेशला अटक केली आहे.
ठाणेदार सीताराम म्हेत्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते, स पो नी अजय वाढवे, अमोल मुडे, पो उप नी धनराज हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कौशल्यपूर्वक तपास करून अवघ्या 2 तासात आरोपीला अटक करून त्याला बेडया ठोकल्या.