प्रेमात लोक इतके आकांत बुडतात की त्यांना आपल्या जोडीदाराविषयी सत्य परिस्थिती जाणून घ्यायची इच्छाही होत नाही. अनेक जण कोणत्याही स्थितीत आपल्या प्रेमाचा स्वीकार करतात. मात्र नंतर सत्य समजल्यावर त्यांना धक्का बसतो. अशीच एक अनोखी प्रेमकथा जपानमध्ये घडली आहे.
अकी नामक महिला जपानमध्ये जपानी स्टाईल बार चालवायची. तेथे तिला एक व्यक्ती भेटली. योशीताका असे त्याचे नाव. कालांतराने त्यांच्यात मैत्री झाली आणि योशीताका हा अकीच्या प्रेमात पडला. दोघेही घटस्फोटीत असून आपापल्या मुलांना एकटेच सांभाळायचे. ज्यावेळी ते प्रेमात पडले तेव्हा अकीने ती 44 वर्षांची असून त्यांच्या 15 वर्षांचा फरक असल्याचे सांगितले होते. अकी आणि योशीताका सात वर्षांपासून रिलेशनमध्ये होते.
2020 मध्ये दोघेही लग्न करणार होते. मात्र त्यावर्षी देशात कोरोनाच्या महामारीचे सावट आले. अकी देखील आजारी पडली. त्यामुळे अकीला कोरोना झाला, असे योशीताकाला वाटलं. म्हणून त्याने अकीला दवाखान्यात नेले. यावेळी अकी डॉक्टरांशी संभाषण करणे टाळत होती. कारण अकीला योशीताका आपल्या वयाचे सत्य समजल्यावर तो सोडून जाईल, अशी तिला भीती होती. मात्र तरीही तिने योशीताकाला सत्य सांगायचे ठरवले.
अकीने योशीताकाला सांगितले की ती त्याच्यापेक्षा 15 नाही तर 25 वर्षांनी मोठी आहे आणि सध्या तिचे वय 61 वर्षे आहे. हे सत्य ऐकून योशीताका हैराण झाला. मात्र योशीताका म्हणाला – मला तुमच्या वयाची पर्वा नाही. मला वाईट वाटते की तू मला आधी का सांगितले नाहीस. आपले प्रेम आहे एकमेकांवर आणि ते तसेच रहिले, असे तो म्हणाला. यानंतर दोघांनी लग्न केले.
योशिताका आणि अकीची प्रेमकथा पहिल्यांदा 2021 मध्ये व्हायरल झाली होती. मात्र आता जपानी वृत्तपत्र बनशुन ऑनलाइनने प्रकाशित केल्यानंतर ती पुन्हा समोर आली. 65 वर्षीय अकीने सांगितले की जपानी समाज वृद्ध स्त्रियांना तरुण पुरुषांशी डेटिंग किंवा लग्न करण्याच्या विरोधात होता. त्यामुळे तिने तिचे खरे वय योशिताकाकडून लपवले होते.