जातप्रमाणपत्रासाठी लातुरात तरुणाची आत्महत्या, नातेवाईकांचा सहा तास ठिय्या

मुलांच्या शिक्षणासाठी महादेक कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे दादगी येथील शिवाजी वाल्मीक मेळ्ळे (32) यांनी शनिवारी सायंकाळी विजेच्या तारेला स्पर्श करत आत्महत्या केली. यानंतर नातेवाईकांनी जातीचे प्रमाणपत्र अन् वैधता सुलभतेने द्या, मयताच्या वारसांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी सहा तास ठिय्या आंदोलन केले.

मयत शिवाजी मेळ्ळे यांची मुलगी सहावीला तर मुलगा चौथीला आहे. त्यांनी एक वर्षापूर्की दोन्ही मुलांचे महादेव कोळी जातीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून अर्ज दाखल केला होता. परंतु, हे प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होईल या भीतीने ते अस्वस्थ होते. त्यामुळे त्यांनी 13 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास विजेच्या तारेला धरून जीवन संपवले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मयताच्या नातेवाईकांसह शेकडो महिला, पुरुष समाजबांधवांनी तब्बल सहा तास ठिय्या मांडत मयताच्या नातेकाईकांना 50 लाख रुपयांची मदत देण्यात यावी, मयताच्या कुटुंबीयांना शासकीय नोकरी मिळावी, निलंगा उपविभागीय अधिकाऱ्यांकर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, मराठवाड्यातील जातीचे प्रमाणपत्र व वैधता सुरळीतपणे मिळावी.

मेडिकल व इंजिनिअरिंग क्षेत्रातील व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे त्यामुळे अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रमाणे सहा महिन्यांसाठी वैधतेची अट शिथिल करावी यासह विविध मागण्यांसाठी ठिय्या मांडला. निलंगा येथील उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्याकर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईक आणि समाजबांधवांनी केली आहे. गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे.