मध्यरात्री ईमेल तपासायला उठला, इनबॉक्समधील संदेश पाहून तरुणाची झोपच उडाली

ऑस्ट्रेलियामध्ये राहत असलेल्या एका व्यक्तीसोबत रात्रीची झोप उडवणारी घटना घडली आहे.  जॉनचा (बदललेलं नाव) गुरुवारी लवकर डोळा लागला होता.  लवकर झोप लागल्याने त्याला पहाटेच्या सुमारास जाग आली होती. पुन्हा झोपेसाठी डोळे मिटण्याआधी त्याच्या डोक्यात मोबाईल पाहू, असा विचार झाला होता.  यामुळे त्याने ईमेल तपासायला सुरुवात केली आणि त्यातला एक ईमेल पाहून त्याची झोपच उडाली.
ब्रिस्बेनमधील सँडगेटमध्ये राहाणारा जॉन हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचं काम करतो. गेल्या काही वर्षांपासून त्याने लॉटरी खेळायला सुरुवात केली होती.   जॉनने पावरबॉल लॉटरीमध्ये भाग घेतला होता, त्याच्या ध्यानीमनीही नसताना  तो या लॉटरीमध्ये विजयी झाला होता. त्याला या लॉटरीतून 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 75 कोटी रुपयांचं बक्षीस लागलं आहे.  बक्षिसाच्या रकमेचा आकडा पाहून जॉन जबरदस्त आनंदी झाला आहे.
लॉटरी जिंकल्यानंतर काय करणार असा प्रश्न जॉनला विचारला असता त्याने सांगितलं की मी माझं काम सोडणार नाहीये. यापेक्षाही जास्त रकमेची लॉटरी जरी जिंकलो तरी मी माझं काम कधीही सोडणार नाही असं तो म्हणाला आहे.  ही बाब मी माझ्या कुटुंबीयांनाही सांगितल्याचं त्याचं म्हणणं आहे. काम केलं नाही तर मी कंटाळून जाईन असं जॉनने म्हटलं आहे.  असं असलं ती या लॉटरीमुळे माझ्या आयुष्यातील अनेक कटकटी कमी होतील असा दावा त्याने केला आहे. जॉनने म्हटलंय की लॉटरीच्या पैशातून तो त्याच्या आईवडिलांसाठी एक घर घेणार आहे.  डोक्यात बऱ्याच गोष्टी आहेत मात्र मी बक्षिसाची रक्कम पाहून इतका आनंदीत झालो आहे की मला विचारच करता येत नाहीये असं जॉनचं म्हणणं आहे.  लॉटरी जिंकल्याची बाब आपल्याला अजूनही स्वप्नवत वाटत असल्याचं जॉनने सांगितलं आहे.
आपली प्रतिक्रिया द्या