
राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना हाताशी धरुन अनेक शेतकऱयांच्या जमिनी लाटल्याचा ठपका असणारे राजेंद्र घनवट यांच्या पत्नी मनाली घनवट यांचे पुण्यातील ज्युपिटर रुग्णालयात निधन झाले. मनाली यांच्या मृत्यूबद्दल सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मनाली यांची ही आत्महत्या असून, त्यांचा मृत्यू नैसर्गिक झाल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.
राजेंद्र घनवट हे धनंजय मुंडे यांच्या कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत, याच घनवटने शेतकऱयांच्या जमिनी लाटल्या आहेत व याच जमिनीच्या चौकशीची मागणी, मी महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे केली होती. ही आत्महत्या असल्याचे त्यांच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे असे दमानिया म्हणाल्या.