
भरधाव कारने दोन दुचाकींना उडवल्याची घटना माणगावमध्ये घडली आहे. ही धडक इतकी भीषण होती की यात पाचजण जखमी झाले. अक्षय मुंढे, रोहिदास पवार, सुशील मुंढे, अल्पेश पानसरे आणि रोहित मुंढे अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीर झाली.
नाणोरे गावच्या हद्दीत रविवारी रात्री रोहित मुंढे त्याच्या भावासह दुचाकीवरून जात होता. ते एचपी पंपाजवळ आले असता समोरून येणाऱ्या सुसाट कारने त्यांच्यासह आणखी एक दुचाकीला धडक दिली. यामध्ये पाचजण जखमी झाले. यातील तिघांवर माणगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर इतर दोघांना पुढील उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कारचालक अमित मेहता याच्या विरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.
एक्स्प्रेस वेवर चालकाचा मृत्यू
खालापूर : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खालापूर टोलनाक्यावर आज सकाळी सहा वाजता भीषण अपघात झाला. नियंत्रण सुटलेल्या टेम्पोने रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की यात टेम्पोचालकाचा मृत्यू झाला. सेहुल बबन असे मृत चालकाचे नाव आहे. छातीत स्टेअरिंग धुसल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात टेम्पोचेही




























































