दिल्लीतील कथीत मद्य धोरण घोटाळ्यांमध्ये अडकवलेले माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे तुरुंगाबाहेर आल्यानंतर चांगलेच आक्रमक झाले आहेत. सुप्रीम कोर्टाने हुकूमशाही चिरडली, असा सणसणीत टोला सिसोदिया यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवालदेखील लवकरच बाहेर येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सिसोदिया यांनी आज ‘आप’च्या कार्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केले. सुप्रीम कोर्टाने संविधानाच्या नियमानुसार आपल्याला न्याय दिल्याचे ते म्हणाले. ‘भगवान के घर देर है, अंधेर नही,’ असेही ते म्हणाले. तुरुंगातून सुटल्यानंतर सिसोदिया यांनी आज केजरीवाल यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सिसोदिया यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांनाही अभिवादन केले. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.