शिवसेना नेते, दिवंगत मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली 2008 साली उरणमध्ये सेझविरोधात आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनात मनोहर भोईर सहभागी झाले होते. त्यानंतर तब्बल 16 वर्षांनी या प्रकरणात आज मनोहर भोईर यांना अटक केली आहे. काल या केसची सुनावणी होती. ती सुनावणी झाली नाही. सुनावणी आधीच पोलिसांनी त्यांना अटक केली. निवडणुकीच्या तोंडावर मिंधे सरकारने हा रडीचा डाव खेळला आहे.
उरणचे शिवसेनेचे माजी आमदार मनोहर भोईर यांना अटक झाल्यानतंर न्यायालयाकडून काही तासांतच जामीन मंजूर करण्यात आला.