भाजप, मिंधेसाठी विद्यार्थी सात तास वेठीला, विज्ञान प्रदर्शनाला आलेली मुले भुकेने भिरभिरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोखाडा पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची मिंधेगिरी समोर आली आहे. पंचायत समितीने 52 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. मात्र या कार्यक्रमाला मिंधे गटाचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम व भाजप आमदार हरिश्चंद्र भोये हे ठरलेल्या वेळेपेक्षा उशिरा आल्याने अधिकाऱ्यांनी सकाळी 9 वाजता 3 पर्यंत ताटकळत बसवून ठेवले होते. त्यामुळे उपाशीपोटी असलेली मुले भुकेने भिरभिरली. आमदारांना खूश करण्यासाठी विद्यार्थ्यांना सात तास वेठीस धरल्याने संताप व्यक्त होत आहे.

मोखाडा तालुक्यातील आलेल्या विद्यार्थ्यांना दुपारी खोडाळा विभाग हायस्कूलमध्ये आयोजित विज्ञान प्रदर्शनात 32 शाळांनी नोंदणी केली होती. त्याशिवाय आणखी 10 शाळाही सहभागी झाल्या. शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रस्तुत प्रदर्शनासाठी सकाळी 9 वाजेपासून विद्यार्थी हजर होते. मात्र कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी 4 वाजता झाल्याने तब्बल सात तास विद्यार्थ्यांना ताटकळत बसावे लागले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांना अध्यक्ष तर आमदार हरिश्चंद्र भोये यांना उद्घाटक म्हणून या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आले होते. हे दोन्ही पाहुणे कार्यक्रमाला उशिरा हजर झाल्याने या कार्यक्रमाचा पुरता विचका उडाला.

उपसभापतींनीच काढले वाभाडे 

उद्घाटनास उशीर झाल्याने उपसभापती प्रदीप वाघ यांनी अधिकाऱ्यांना प्रयोग हे शिक्षक आणि देतात. तसेच काही प्रयोग अथवा अन्य शहरातून धारेवर धरले. अनेक पालक विद्यार्थ्यांना बनवून हे उल्हासनगर, नाशिक विकत घेऊन प्रदर्शनात मांडले जात असल्याचे सांगून त्यांनी या प्रदर्शनाचीच लक्तरे वेशीवर टांगली आहे.