
सरकारमधील लोकच हैदराबाद गॅझेटविरोधात कोर्टात जात आहेत. मंत्री छगन भुजबळांचा जामीन रद्द करून मंत्रिमंडळाबाहेर काढा, अशी मागणी करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून राज्य सरकारवर तीव्र हल्ला चढवला आहे.
तुम्ही मोठय़ा मनानं हैदराबाद गॅझेटचा जीआर काढला, पण भुजबळ त्याला विरोध करताहेत. भुजबळांनी गॅझेटविरोधात पाच याचिका दाखल केल्या, हे तुमच्या परवानगीशिवाय शक्य आहे का? असे म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे.
येत्या कॅबिनेट बैठकीत सातारा संस्थानचे गॅझेट काढा. आता आमच्यात थांबायची क्षमता नाही. सरकारने विलंब केला, तर आम्ही पुन्हा निर्णायक आंदोलन छेडू. मराठा समाजाची सहनशीलता आता संपत आली आहे, अशी भूमिका जरांगे यांनी मांडली आहे.


























































