
मराठा आरक्षणासाठी दुसऱ्यांदा बेमुदत उपोषण करत असलेले मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून त्यांनी वैद्यकीय तपासणीस नकार दिला आहे. आमचा समाज शांतताप्रिय आहे, याच मार्गाने आंदोलन करीत आहोत, हिंसक घटनेचे आम्ही कदापिही समर्थन करत नाही, असेही मनोज जरांगे म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारने मागून घेतलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे 25 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. राजकीय पक्ष, नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. गावोगावी साखळी उपोषण करून मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा दिला जात आहे.
गुणरत्न सदावर्तेच्या गाडी फोडाफोडीच्या घटनेवर बोलताना ते म्हणाले उलट त्यांनी माझ्या अटकेची केलेली मागणी ही त्यांच्या मालकाच्या अडचणीत भर टाकणारी आहे, असा टोला त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख टाळून हाणला.
मिंधे सरकारच्या विकासाच्या फसव्या जाहिरातींना फासला रंग
विकासाच्या फसव्या जाहिराती एसटी, बेस्ट आणि स्थानकांवर लावून उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर मंगळवेढय़ात मराठा आंदोलकांनी प्रचंड संताप व्यक्त करत मिंधे सरकारच्या फसव्या जाहिरातींना रंग फासून निषेध व्यक्त केला. या एसटीवर अण्णासाहेब पाटील योजनेशी संबंधित जाहिरात लावण्यात आली होती.




























































