बीडचा मेळावा विशिष्ट जातीचा, मनोज जरांगे पाटील यांचा हल्लाबोल

बीडमध्ये झालेला मेळावा हा ओबीसींचा मोर्चा नव्हता, तर तो एका विशिष्ट जातीचा आणि टोळीचा मोर्चा होता हे सिद्ध झाले आहे. त्यांच्या काही गोष्टी बाहेर पडत आहेत. ओबीसी ओबीसी बोंबलायचं आणि मराठा-ओबीसींमध्ये तणाव निर्माण करायचा. त्यातून मंत्रिपद साधायचे, असे भुजबळांनीच सांगितले, असा हल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी आज सरपंचाच्या मळ्यात डोळ्याला चष्मा लावून घोडेस्वारी केली. यावेळी चष्मा आपलाच आहे का? असा टोला अप्रत्यक्षपणे आमदार धनंजय मुंडेंना लगावला. मी ओबीसी ओबीसी बोंबललो आणि मला न द्यावे लागलेले मंत्रिपद द्यावे लागले, असा हल्लाबोल करत छगन भुजबळ यांचे चक्रव्यूह प्रचंड घातक आणि विषारी आहे. या षडयंत्रात एकदा गुंतलं की बाहेर निघता येत नाही. मराठा लेकरांचे वाटोळे का करावे? असे पंकजा मुंडे यांना वाटले असावे, त्यामुळे त्या मेळाव्याला आल्या नसतील, असेही ते म्हणाले.