
मोदी सरकारने केलेले अनेक जाचक आणि जुलमी कृषी कायदे त्वरित रद्द करावेत, कांद्याला योग्य तो भाव द्यावा, जुनी पेन्शन योजना लागू करावी, जमिनी नावावर कराव्यात अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिह्यातील आदिवासींनी भव्य लाँग मार्च काढला. आदिवासींचे हे महावादळ मुंबईच्या दिशेने धडकत असून मोर्चेकरी विधान भवनावर कूच करणार आहेत. अखिल भारतीय किसान सभेसह अनेक संघटना केंद्र व राज्य सरकारला जाब विचारणार असून या या लाँग मोर्चमध्ये हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव व भगिनी सहभागी झाल्या आहेत. हे वादळ मंगळवारी कसारा घाटातून पुढे सरकले.


























































