शिवसेनेनं घेतलेला आक्षेप सत्य, महापौरपदाच्या आरक्षणात फिक्सिंग झाली – विजय वडेट्टीवार

महानगरपालिकांच्या महापौर पदांच्या आरक्षण सोडतीवरून राजकीय वातावरण तापलयं. काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी या सोडतीवर गंभीर आक्षेप घेतला असून, ही प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप केलाय. आरक्षणात पूर्णपणे फिक्सिंग करण्यात आली असून, सोयीनुसार आरक्षण काढण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय. तसेच आरक्षण सोडतीवरून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) घेतलेला आक्षेप सत्य असल्याचं ते म्हणाले आहेत.

नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ही संपूर्ण सोडत पारदर्शक नाही. यामध्ये पूर्णपणे फिक्सिंग आहे. आपल्या (भाजप) सोईनुसार हे काढलेलं आरक्षण आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. मुंबईमध्ये जे आरक्षण काढलं गेलं, ते सुद्धा एसटीसाठी ज्यावेळी नावं टाकलं गेलीत, एसटीच्या महानगरपालिका ठरवल्या, त्यावेळेस त्यामध्ये मुंबईचा समावेश नव्हता.”

ते म्हणाले, “मी पर्वा बोलताना म्हणालो, जर हे आरक्षण नागरपूरमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी येत असेल तर, हे आरक्षण फिक्स केलेलं आहे. कारण महापौरपदाचा उमेदवार ठरलेला आहे. भाजपपेक्षा त्यांचं नाव मी जाहीर करून देतो. भारतीय जनता पक्षाकडून शिवानी दाणी या नागरपूरमध्ये भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार आहेत. यात बरोबर सर्वसाधारण आलं आहे. हा सगळा जो आरक्षणाचा घोळ सुरू आहे, यामध्ये शिवसेनेने घेतलेला आक्षेप तो सत्य आहे.”