
ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित एमसीसी लिटिल स्टार लीग (14 वर्षांखालील) स्पर्धेत एमसीसी ठाणे ‘अ’ संघाच्या विजयात शतकवीर विवान गुर्जर आणि अष्टपैलू रचित पाटील चमकले.
पहिल्या सामन्यात एमसीसी ठाणे ‘अ’ संघाने विबग्योर स्ट्रायकर्सवर 5 विकेट राखून मात केली. विबग्योर स्ट्रायकर्सनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 35 षटकांत 194 धावा केल्या. त्यात हृदय मेहताने (45) सर्वाधिक योगदान दिले. एमसीसी ठाणे संघाकडून आयुष सुतार, रचित पाटीलने प्रभावी मारा केला. 195 धावांचा पाठलाग करताना एमसीसी ठाणे ‘अ’ संघाने 32.5 षटकांत 5 विकेटच्या बदल्यात पार केले. विवान गुर्जरने 87 चेंडूत 103 धावांची झटपट खेळी करून विजयात मोलाचा वाटा उचलला.
संक्षिप्त धावफलक –
विबग्योर स्ट्रायकर्स – 35 षटकांत सर्वबाद 194 (हृदय मेहता 45, आयुष सुतार 3/25, रचित पाटील 3/31)
वि. एमसीसी ठाणे ‘अ’ – 32.5 षटकांत 5 बाद 195 (विवान गुर्जर 103, दिव्यम मुथा 3/18).


























































