17 जानेवारीला दोन्ही राष्ट्रवादीची कुठलीही गुप्त बैठक झाली नव्हती, सुनील तटकरे यांचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिवंगत अजित पवार यांच्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. अजित दादांचा अस्थिकलश संपूर्ण महाराष्ट्रात नेण्यात येणार असून, राज्यभरात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्याचा पक्षाचा मानस असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये एका बैठकीचे दृश्य दिसत आहे. या बैठकीबाबत स्पष्टीकरण देताना सुनील तटकरे म्हणाले की, ही बैठक एका कृषी प्रदर्शनादरम्यान चहापानाच्या निमित्ताने झाली होती. त्यावेळी कोणतीही गुप्त किंवा वेगळी चर्चा झाली नव्हती.

या बैठकीनंतर अजित दादांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाल्याचे स्पष्टपणे सांगितले होते, असेही तटकरे यांनी नमूद केले.

“आज होणाऱ्या बैठकीनंतर या सर्व विषयांवर सविस्तर माहिती दिली जाईल. त्यानंतरच आम्ही याबाबत अधिक तपशीलाने बोलू,” असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.