मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरील सिग्नल यंत्रणा, ओव्हरहेड वायर, रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी आणि इतर अभियांत्रिकी कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 1.30 दरम्यान विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत पाचव्या आणि सहाव्या मार्गावरील रेल्वेगाड्या अप जलद आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 दरम्यान कुर्ला-वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 पर्यंत सीएसएमटी-वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या आणि पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 या वेळेत सीएसएमटीला जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी-कुर्ला आणि पनवेल-वाशी विभागात विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.