
सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सायबर गुन्हेगारी गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डॉक्टर, वकील आणि पोलिसही या सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकले आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. सोशल मीडियावर मुलींच्या नावने खोट अकाऊंट बनवत तिघांनी अनेक जणांना गंडा घातला आहे.
उत्तर प्रदेशातील ललितपुर पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बृजेंद्र, नीलेश रजक आणि अंकित रजक अशी आरोपींची नावे आहेत. हे तीघे मुलींच्या नावाने इन्स्टाग्राम, फेसबुक आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर खोटी आयडी बनवून मुलांना आपल्या जाळ्यात अडकवत होते. तसेच त्यांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांना अश्लील व्हिडीओ पाठवून त्याचे ते रिकॉर्डींग करत होते. त्यानंतर पोलीस असल्याचे सांगत ते लोकांना ब्लॅकमेल करत होते.
पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. आरोपींकडून 37 हजार रुपये, 7 अॅड्रॉइड मोबाईल, 13 सीमकार्ड आणि 5 ATM कार्ड सह इतर अनेक गोष्टी जप्त केल्या आहेत. सायबर गुन्हेगारांपासून वाचण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहवे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.