
मेटाने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ आणि रील्स मजेदार बनवण्यासाठी एक उत्तम फिचर लाँच केले. एआय व्हॉइस ट्रान्सलेशन टूल असे त्याचे नाव आहे. सध्या, हे टूल फक्त इंग्रजी आणि स्पॅनिशमध्ये उपलब्ध आहे, परंतु लवकरच या टूलमध्ये इतर भाषादेखील जोडल्या जातील. हे फिचर मोफत आहे. क्रिएटर्सना ते वापरण्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाहीत. मेटाच्या मते, एआय व्हॉइस ट्रान्सलेशन टूल सक्षम केल्यानंतर, ते सध्या रीलची भाषा इंग्रजी आणि स्पॅनिशमध्ये ऑटोमॅटिक डब करेल. ते केवळ भाषेचे भाषांतरच करणार नाही तर लिप-सिंकदेखील योग्यरीत्या करेल.
मेटाच्या म्हणण्यानुसार, हे टूल फक्त भाषेचे दुसऱया भाषेत रूपांतर करेल. या टूलबद्दल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते निर्मात्यांचा टोन, त्यांची शैली किंवा मूळ सामग्रीचा उद्देश बदलणार नाही. या एआय सिस्टीमला अशा प्रकारे प्रशिक्षित केले गेले आहे की ते निर्मात्यांचा मूळ आवाज आणि टोन त्याच प्रकारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकेल.