मेटाने मार्केटमध्ये आणला नवा स्मार्ट चष्मा

जगात एकापेक्षा एक भन्नाट एक टेक्नॉलॉजी येत आहे. स्मार्टफोन, स्मार्टवॉच नंतर आता स्मार्ट चष्मा लाँचिंग केला जात आहे. प्रसिद्ध गॉगल कंपनी रे-बन आणि मेटाने मिळून एक नवीन स्मार्ट चष्मा लाँच केला आहे. या चष्म्याचे खास वैशिष्ट्ये म्हणजे, या चष्म्याने फोटो काढता येतील, कॉल करता येईल तसेच गाणे ऐकता येतील. इतकेच काय तर एआयच्या मदतीने रियल टाइमची माहितीसुद्धा मिळवता येईल. या स्मार्ट चष्म्यामध्ये कॅमेरा, माइक, स्पीकर आणि एआय टेक्नॉलॉजी दिली आहे. हा चष्मा घातल्यानंतर फोटोसुद्धा काढता येऊ शकतात. हा चष्मा एआयसाठी सर्वात चांगला ऑप्शन आहे, असे मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी म्हटले आहे.