
म्हाडाच्या नुकत्याच झालेल्या मास्टर लिस्ट सोडतीत 300 पेक्षा जादा चौरस फुटांच्या घरासाठी रेडिरेकनरच्या 110 टक्के रकमेऐवजी 100 टक्के दराने रकमेची आकारणी करण्याचा निर्णय म्हाडा उपाध्यक्षांनी घेतला होता. याचा फायदा या सोडतीमधील 89 रहिवाशांना होणार आहे. यामुळे म्हाडाला मात्र 3 कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागणार आहे.
वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात राहणाऱया रहिवाशांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाने 24 एप्रिलला मास्टर लिस्टरील 105 पात्र रहिवाशांसाठी सोडत काढली होती. 300 ते 753 चौरस फुटांच्या घरांसाठी पाच टप्प्यांत सोडत काढली. 300 चौरस फुटांपर्यंतची घरे रहिवाशांना मोफत दिली जातात. त्यापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळासाठी म्हाडा आतापर्यंत रेडिरेकनरच्या 110 टक्के दराने आकारणी करत होती.
- जादा क्षेत्रफळासाठी रेडिरेकनरच्या 110 टक्क्यांऐवजी 100 टक्के दराने रकमेची आकारणी करण्याचा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सोडतीवेळी जाहीर केला होता. त्यानुसार 300 हून अधिक चौरस फुटांची घरे लागलेल्या 89 जणांना दिलासा मिळणार आहे.