दुधाच्या टँकरचा अपघात, जखमींची मदत करण्याऐवजी लोकांनी दुधावर मारला डल्ला

माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये एका दुधाच्या टँकरचा अपघात झाला. पण उपस्थित नागरिकांनी जखमींची मदत करण्याऐवजी सांडलेल्या दुधावर डल्ला मारला. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार गाजियाबादमध्ये दुधाचा ट्रॅक्टर आणि ट्रकमध्ये अपघात झाला. या अपघातात ट्रक ड्रायव्हरचा जागीच मृत्यू झाला, तर हेल्पर जखमी जखमी झाला होता. या अपघातानंतर टँकरमधले दूध वाहू लागले. तेव्हा उपस्थित लोकांनी जखमींची मदत करण्याऐवजी दुध गोळा करायला सुरूवात केली. ट्रकमध्ये आणखी काही प्रवासी होते, ते सुद्धा मदतीसाठी याचना करत होती. पण लोक दुध घेण्यातच व्यग्र होते.

पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल केले असून अपघात झालेल्या गाड्यांना क्रेनने हटवण्यात आले आहे.