
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. नागपुरात
एका अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने बलात्कार केला आहे. धक्कादायक म्हणजे पोलीस ठाण्याच्या हद्दीतच हा गुन्हा घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार साहिल चंदेल हा चालक म्हणून काम करत होता. काही दिवसांपूर्वी त्याच्या भावाच्य लग्नात त्याची ओळख या अल्पवयीन मुलीशी झाली. त्यानंतर ओळख वाढवून चंदेले या मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. चंदेलने मुलीला फूस लावून कारमध्ये बोलावले आणि नागपूरच्या बेलतरोडी भागात एका निर्जन ठिकाणी नेले. तेव्हा साहिलने कारमध्येच तिच्यावर अत्याचार केला. मुलीने त्याला विरोध केला पण चंदेलने बधला नाही. यात पीडित तरुणी जखमी झाली.
पीडित तरुणीने घरी धाव घेतली आणि झाला प्रकार सांगितला. कुटुंबीयांना तातडीने पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी साहिल विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसोच तातडीने त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली.