जंगल में भौकाल… अखेर प्रतिक्षा संपली, ‘या’ दिवशी येणार कालीन भैय्याचा मिर्झापूर

अॅमेझॉन प्राईमवरील मिर्झापूर ही वेब सिरीज चांगलीच गाजली. या वेबसिरीजमधील कालीन भैय्या, बबलू, गुड्डू, मुन्ना, गजगामिनी यांच्या भूमिका देखील गाजल्या. सध्या प्रेक्षक या वेबसिरीजच्या तिसऱ्या भागाची वाट पाहत आहे. गेल्या काही दिवासंपासूनपासून निर्माते त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेची उत्कंठा वेगवेगळ्या प्रकारे वाढवताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by prime video IN (@primevideoin)

अखेर मंगळवारी मिर्झापूरच्या निर्मात्यांनी या वेबसिरीजच्या तिसऱ्या सिझनच्या प्रदर्शनाची घोषणा केली आणि चाहत्यांची प्रतिक्षा संपली. या वेब सिरीजचा तिसरा सिझन येत्या 5 जुलैला रिलीज होणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये दहा एपिसोड असणार आहेत. या वेब सिरीजमध्ये पंकज त्रिपाठी, विजय वर्मा, अली फजल, श्वेता त्रिपाठी, रसिका दुगल यांच्या मुख्य भूमिका आहेत.