दिवसभर सुंदर, ताजेतवाने दिसण्यासाठी रात्री फक्त एक चिमूट हळदीचा असा वापर करा! वाचा सविस्तर

हळद ही केवळ आपल्या स्वयंपाकघरातील उपयुक्त गोष्ट नाही तर, ती त्वचेसाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण हळदीचा विविध पद्धतीने वापर करु शकतो. नाईट क्रीममध्ये थोडीशी हळद घातली तर ती झोपतानाही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकते. हळदीमुळे तुमची त्वचा चमकदार आणि निरोगी राहण्यास मदत होते. हळद आपल्या त्वचेवरील काळे डाग कमी करण्यास आणि त्वचेची वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यास मदत करते. मुख्य म्हणजे हळदीमध्ये आढळणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे, त्वचेची जळजळ शांत होते. तसेच हळद त्वचेला खोलवर हायड्रेट करण्यासोबत कोलेजन देखील वाढवते, त्यामुळे आपली त्वचा अधिक तरुण दिसते.

रात्री चेहऱ्याला क्रीम लावताना त्यात चिमूटभर हळद घालण्याचे फायदे

हळद आपल्या त्वचेवरील ओलावा टिकवून ठेवण्यास आणि कोरडेपणा टाळण्यास मदत करते. नाईट क्रीममध्ये कोरफड, हायल्यूरॉनिक अॅसिड किंवा ग्लिसरीन सारख्या हायड्रेटिंग घटकांसह मिसळल्यास, त्वचेला खूप फायदे होतात.

 

हळदीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे वृद्धत्वासाठी जबाबदार असलेल्या मुक्त रॅडिकल्सशी लढतात. त्यामुळे आपले कोलेजन वाढण्यास मदत होते. हळदीमुळे त्वचेवरील बारीक सुरकुत्या कमी व्हायला मदत होते.

हळदीमुळे आपल्या त्वचेवरील काळी वर्तुळे आणि सूज कमी करण्यास मदत होते. तसेच हळद रक्ताभिसरण सुधारण्यास देखील मदत करते. हळद रात्रभर लावून ठेवल्यास, सकाळी चेहरा ताजातवाना दिसतो.

 

Benefits of turmeric milk- सांधेदुखीवर जालीम इलाज आहे हळदीचे दूध, हळदीचे दूध पिण्याचे इतर फायदे

 

नाईट क्रीममध्ये हळद कशी घालावी?
नाईट क्रीममध्ये हळद अनेक प्रकारे घालू शकता. उदाहरणार्थ सामान्य नाईट क्रीममध्ये चिमूटभर ऑरगॅनिक हळद पावडर घाला. ते चांगले मिसळा आणि चेहऱ्यावर पातळ थर लावा. रात्रभर तसेच राहू द्या आणि सकाळी चेहरा धुवावा.