
‘नरेंद्र मोदी आणि ईव्हीएमच्या जिवावर भाजपवाल्यांचा माज सुरू आहे. मुंबई ताब्यात घेऊन संपूर्ण महानगर प्रदेश गुजरातला जोडण्याचं त्यांचं स्वप्न आहे. त्यांचे हे स्वप्न गाडून टाकण्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत मुंबईला वाचवायचं आहे,’ असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना केले.
मुंबईतील रंगशारदा सभागृहात झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना व मनसे युतीच्या घोषणेनंतर पहिल्यांदाच केलेल्या जाहीर भाषणात त्यांनी कार्यकर्त्यांना एकजूट राहण्याचे आवाहन केले. ‘मुंबईचा लचका तोडण्याचे काम सुरू आहे. ते आपल्याला होऊ द्यायचे नाही. मुंबई राखायचीच आहे. त्यासाठीच मतभेद बाजूला ठेवले आहेत,’ असे राज ठाकरे म्हणाले.
संकट नीट ओळखा, नाराज होऊ नका!
‘कुणाला किती जागा मिळाल्या याची आकडेवारी मांडून नाराज होऊ नका. आपल्याला युतीधर्म पाळायचा आहे. संकट नीट ओळखा. मुंबई वाचवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. मराठी माणसाच्या हितापुवैयक्तिक स्वार्थ क्षुल्लक आहे,’ असेही राज ठाकरे यांनी सांगितले.






























































