मोबाईल गेमच्या नादात लाखो रुपये गमावले, नंतर उचलले टोकाचे पाऊल

मोबाईल गेमचे व्यसन एका मुलाच्या जीवावर बेतले आहे. ओडीशाचा एका मुलाने मोबाईलच्या गेममुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हे रुपये या मुलाने त्याच्या ओळखीच्या लोकांकडून उधार घेतले होते. त्यामुळे त्यांनी त्याच्याकडे पैसे मागण्यासाठी तगादा लावला होता. मात्र त्याच्याकडे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते. अखेर त्या त्रस्त तरुणाने अखेर आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

कालियापानी येथील कडुबनी गावात राहणारा तरुण श्रीनिवास नायक याला मोबाईलवर गेम खेळण्याचे व्यसन लागले होते. तो दिवस रात्र मोबाईलवर गेम खेळायचा. तर अनेक असेही गेम होते ज्यावर तो पैसे लावून खेळायचा. त्यासाठी तो ओळखीच्या लोकांकडून उधार पैसे घ्यायचा. तो मोबाईल गेममध्ये मोठे प्राईजमनी जिंकून लोकांचे पैसे देण्याच्या तयारीत होता मात्र त्याला यश येत नव्हते.

श्रीनिवास रात्री त्याच्या खोलीत झोपायला जाण्यापूर्वी त्याने कुटुंबासोबत एकत्र जेवण जेवला. त्यानंतर तो नेहमीप्रमाणे त्याच्या खोलीत झोपायला गेला. मात्र नेहमीप्रमाणे तो सकाळी न उठल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली. त्यांनी त्याच्या खोलीचा दरवाजा ठोकला मात्र आतून काहीच आवाज आला नाही. अखेर त्यांनी दरवाजा तोडला आणि आत गेल्यावर त्यांच्या पायाखालची जमिन सरकली. त्याचा मृतदेह पंख्याला लचकलेल्या अवस्थेत होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

मोबाईल गेमिंगसाठी पैसेही घेतले होते. गेमिंगमध्ये झालेल्या नुकसानीमुळे कर्जाची परतफेड करू शकलो नाही. तो बराच काळ दबावाखाली होता. कर्जदार त्याच्याकडे कर्जाची परतफेड करण्याची मागणी करत होते. अशा स्थितीत त्याने आत्महत्या केली.