विंग कमांडर अभिनंदन देणार तरुणांना ‘ऍक्शन गेम’चे धडे

139

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

लहान मुले असो की, तरुण असो प्रत्येक जण आज कॉम्प्युटर किंवा मोबाईल गेममध्ये व्यस्त असतो. पबजीत तर तरुणही गुंतलेले असतात. त्यामुळे तरुणांची आवडनिवड लक्षात घेऊन त्यांना देशाच्या संरक्षणाकडे वळवण्यासाठी, देशसेवेकडे वळवण्यासाठी हिंदुस्थानी हवाई दलाने खास ‘इंडियन एअर फोर्स: ए कट अबव्ह’ हा व्हिडिओ गेम बनवला आहे. हवाई दलाचे प्रमुख बीरेंद्र सिंह धनोआ यांच्या हस्ते या फ्लाईट सिम्युलेटर गेमचे अनावरण करण्यात आले. यात पाकिस्तानचे एफ-16 लढाऊ विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदनचे पात्र आहे. त्याचबरोबर मिग-21 पासून सुखोई, मिराज, एमआय-17 ही लढाऊ विमाने उडवता येणार आहेत. हा गेम फक्त एकाच व्यक्तीला खेळता येऊ शकतो.

आपली प्रतिक्रिया द्या