पुरुषांना कंटाळून स्वत:शीच लग्न केले, श्रीमंत अरबाने लग्नासाठी दिली कोट्यवधींची ऑफर

विश्वासघातकी पुरुषांना कंटाळलेल्या ब्राझीलच्या मॉडेलने स्वत:शीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. स्वत:शीच लग्न करण्याच्या या निर्णयामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. ख्रिस गॅलरा असं या मॉडेलचं नाव आहे.

एका मुलाखतीमध्ये ख्रिसने सांगितलं आहे की एका अरबाने तिला लग्नासाठी प्रस्ताव दिला आहे. लग्नासाठी आपण 5 लाख डॉलर्स म्हणजेच 3 कोटी रुपये द्यायला तयार असल्याचं या अरबाने म्हटलं आहे.

ख्रिस ही 33 वर्षांची असून तिचं काही दिवसांपूर्वी प्रियकरासोबत ब्रेकअप झालं होतं. यानंतर ती एकटी राहात होती. सुरुवातीला आपल्याला आनंदी राहण्यासाठी साथीदाराची गरज आहे असं आपल्याला वाटत होतं, मात्र अनेक पुरुषांनी विश्वासघात केल्यानंतर आनंदी राहण्यासाठी साथीदाराची गरज नसल्याचं आपल्याला जाणवलं असं ख्रिसने म्हटलंय.

याच कारणामुळे मी माझ्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला असं तिने सांगितलं आहे. ख्रिसने साओ पावलोमधल्या एका चर्चमध्ये जाऊन स्वत:चं स्वत:शीच लग्न लावून घेतलं. या बातमीची जगभर चर्चा झाली होती.

ख्रिसचे या लग्नाच्या वेळचे फोटो व्हायरल झाले होते. ते पाहून अरब शेख वेडापिसा झाला आहे. हे फोटो पाहताच त्याने आपल्याला लग्नासाठी गळ घातल्याचं ख्रिसने सांगितलं आहे.

ख्रिसच्या लग्नाची बातमी पसरताच तिच्या इन्स्टाग्रामवर अनेक तरुणांनी तिला आपल्यासोबत लग्न करण्याची गळ घालायला सुरुवात केली होती. यामध्ये या अरबाचाही समावेश होता. त्याने ख्रिसला पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलंय की तू स्वत:पासून घटस्फोट घे आणि माझ्याशी लग्न कर. यासाठी तो मला 5 लाख डॉलर्स द्यायला तयार आहोत असं त्याने लिहिलं होतं असं ख्रिसने सांगितलं आहे.

ख्रिसने या अरबाला उत्तर दिलं असून त्यात तिने म्हटलंय की मी विकाऊ नाहीये आणि मी तुला ओळखतही नाही. पैशांसाठी मी तुझ्याशी लग्न करणार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या