नरसिंगबावडी मतीमंद तरुणाची आत्महत्या

सामना प्रतिनिधी । पूर्णा

पूर्णा शहरातील महाविरनगर भागातील नरसिंगबावडी विहिरीत एका २४ वर्षीय मतीमंद तरुणाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना बुधवार, २४ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे.

श्रीपाद बाळकृष्ण कुलकर्णी असे त्या मयत तरुणाचे नाव असून २० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता घरातुन कोणाला काहीही न सांगता निघून गेला होता. त्याच्या नातेवाईकांनी त्यांची शोधशोध केली. परंतु ते मिळून न आल्याने सोमवार, २२ एप्रिल रोजी पूर्णा पोलीस ठाण्यात तो हरवला असल्याबाबतची तक्रारही दाखल करण्यात आली होती. अखेर आज बुधवार, २४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता महावीर नगरातील नरसिंगबावडी विहिरीत त्यांचा मृतदेह पूर्णा पोलिसांना आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. या प्रकरणी त्यांचे वडील बाळकृष्ण विठ्ठल कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार अर्जुन रणखांब हे करीत आहेत.