मोदी 100 टक्के ट्रम्प यांच्या कंट्रोलमध्ये, 25 मिनिटे बोलले पण अमेरिकेवर एक शब्दही उच्चारला नाही; राहुल गांधी यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा हल्ला चढवला. ‘‘नरेंद्र मोदी हे ट्रम्प यांच्यासमोर एक शब्दही बोलू शकत नाहीत. मोदी हे 100 टक्के ट्रम्प यांच्या कंट्रोलमध्ये आहेत,’’ असा घणाघाती आरोप राहुल गांधी यांनी केला.

आसाममधील प्रचारसभेत ते बोलत होते. लोकसभेत आज केलेल्या भाषणावरून राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. ‘‘मोदींनी आज 25 मिनिटांचे भाषण दिले. पण अमेरिकेच्या विरोधात एक शब्दही उच्चारला नाही. कारण ट्रम्प यांनी एपस्टीन फाइल्स आणि अदानीच्या भ्रष्टाचाराची भीती दाखवून मोदींना ताब्यात ठेवले आहे. ट्रम्प जो आदेश देतील, तेच मोदी करतात. ते हिंदुस्थानसाठी कामच करत नाहीत. त्यांना हिंदुस्थानींच्या सुरक्षेची अजिबात चिंता नाही,’’ अशी तोफ राहुल गांधी यांनी डागली.