नरेंद्र मोदी अमेरिकेचे गुलाम बनले आहेत, आसाममधील सभेत प्रियांका गांधींचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आसाममधील एका जाहीर सभेत बोलताना काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकार आणि आसाममधील राज्य सरकारवर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे गुलाम बनले असून आसाममध्ये सध्या डबल इंजिनचे नव्हे, तर डबल गुलामीचे सरकार सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

सभेला संबोधित करताना प्रियांका गांधी म्हणाल्या की,”नरेंद्र मोदी इथे येऊन म्हणायचे की आम्ही डबल इंजिनचे सरकार चालवू, पण वास्तवात हे डबल गुलामीचे सरकार चालवत आहेत. नरेंद्र मोदी अमेरिकेचे गुलाम बनले आहेत आणि हिमंता बिस्वा सरमा मोदींचे गुलाम बनले आहेत.”

त्या पुढे म्हणाल्या की, “आज नरेंद्र मोदींच्या धोरणांमुळे संपूर्ण देशात संकट आहे. या डबल गुलामीच्या सरकारने आसामच्या जनतेला गुलाम बनवावे, अशी यांची इच्छा आहे. आसामच्या जनतेला आपल्या हक्कासाठी उभे राहावे लागेल. आपल्याला सर्वांना मिळून असा आसाम घडवायचा आहे, जिथे प्रत्येक तरुणाच्या हाताला काम असेल, भ्रष्टाचाराचा अंत होईल आणि लोक सुखी-समाधानी असतील.”