मोदी सरकारला ‘मुडीज’चा झटका,विकास दर 5.4 टक्क्यांवर ढेपाळणार

321

देशाची ढेपाळलेली अर्थव्यवस्था डोके वर काढणार असल्याची शक्यता धूसर आहे. पाच मिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट डोळय़ासमोर ठेवलेल्या मोदी सरकारला सोमवारी मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने मोठा झटका दिला. या संस्थेने चालू आर्थिक वर्षासाठीचा विकास दराचा अंदाज 6.6 टक्क्यांवरून 5.4 टक्क्यांपर्यंत घटवला आहे. तसेच 2021 मधील विकासदराचा अंदाज 6.7 टक्क्यांवरून 5.8 टक्क्यांवर आणला आहे.

चीनमधून संपूर्ण जगभरात फैलाव झालेल्या कोरोना विषाणूने चीनबरोबरच हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम केला आहे. या विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. आधीच डबघाईला आलेली हिंदुस्थानी अर्थव्यवस्था या विषाणमुळे पुरती ढेपाळली आहे. मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने विकास दराचा अंदाज घटवताना कोरोनाच्या परिणामाचे कारण नमूद केले आहे. चीनमधील कोरोनाचा कहर कमी होईनासा झाल्यामुळे तेथून होणाऱ्या आयातीवर परिणाम झाला आहे. त्याची झळ देशवासीयांना बसणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या