गुंतवणूकदारांची चांदी झाली… अडीच हजाराचा टप्पा पार

वर्ष संपता संपता गुंतवणूकदारांची अक्षरशः ‘चांदी’ झाली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वधारणाऱ्या चांदीच्या भावाने मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोमवारी अडीच लाखांचा टप्पा पार केला. चांदीच्या भावाचा हा उच्चांक आहे.

चांदीचा भाव किलोमागे रोज 10 ते 11 हजारांनी वाआहे. त्यामुळे चांदीचा भाव अडीच लाखांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवला जात होता. तो आज खरा ठरला. सोमवारी चांदीचा भाव एमसीएक्सवर प्रथमच 80 डॉलर प्रति औन्सवर, म्हणजेच अडीच लाखांवर पोहोचला.

2025मध्ये विक्रमी परतावा

शेअर बाजाराची कामगिरी यंदाच्या वर्षात यथातथाच राहिली. व्याजदरांतही कपात झाली. त्यात रशिया-युव्रेन युद्ध, इराण-इस्रायल युद्ध, इस्रायल-हमास संघर्षाची भर पडली. या सगळ्या भू-राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सोने व चांदीकडे मोर्चा वळवला होता. त्याचा थेट परिणाम मागणीवर झाला. त्यामुळे यंदा सोने आणि चांदीने भाव खाल्ला. चांदीने या वर्षी 170 ते 180 टक्के असा विक्रमी परतावा दिला. सोन्यानेही लाखाचा टप्पा पार करत गुंतवणूकदारांना खूष केले.