येत्या सोमवारी अंधेरी, जोगेश्वरी परिसरात अर्धा दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. वेरावली जलाशय येथे 900 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सोमवारी 2 सप्टेंबर मध्यरात्री 1 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत हे काम हाती घेण्यात येणार आहे. या 12 तासांच्या कालावधीत सोमवारी पहाटेपासून दुपारपर्यंत पालिकेच्या के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.